मुंबई-झारखंड प्रवास; 15 प्रवासी पोलिसांच्या ताब्यात

0

जळगाव । देशभरात लॉकडाऊन असतांनाही विनापरवानगी मुंबई ते झारखंड प्रवास करणार्‍या 15 प्रवाशांना जळगाव शहर हद्दीत बहिणाबाई चौकात जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व प्रवासी 3 टॅक्सीमधून चालले होते. त्यांच्याकडे प्रवासाचे मंजुरी पत्र नसल्याचे पोलिसांना अढळून आले. या सर्वांची सिव्हीलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.