मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटला

0

पुणे-जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून टेम्पोमधील कोंबडीची पिल्ल दगावली. हा टेम्पो उरली कांचन येथून पुण्याच्या दिशेने जात होता. ही घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर टेम्पोमधून पिल्ले बाहेर आली आणि सैरावैरा पळत सुटली यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

हा अपघात तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ समोर झाला. गाडी रस्त्याकडेला पलटी झाली. अपघाताचा मोठा आवाज आल्याने,घाबरून कोंबडीची काही पिल्लं दगावली तर काही सैरावैरा झाली.यामुळं बराच काळ वाहतुल विस्कळीत झाली. अद्याप वाहन चालकाचे नाव समजलेले नाही. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.