मुंबई-पुण्यात आणखी १० कोरोना रुग्ण

0

मुंबई: राज्यात कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सहाजण मुंबईचे असून चारजण पुण्याचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६४वरून ७४वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, सकाळी कोरोनाच्या एका रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.