मुंबई मनपाने मागील ५ वर्षात २५ हजार वृक्षतोड केली: आशिष शेलार

0

मुंबई: नुकताच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून मागील ५ वर्षात २५ हजार वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आल्या असल्याचा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप, सेनेत वाकयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ५ वर्षा २५ हजार वृक्ष तोडण्यात आली आहे, त्यावेळी शिवसेनेचे पर्यावरण प्रेम कुठे गेले होते असा टोला त्यान यावेळी लगावला.

शेलार यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, “मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे अर्थसंकल्पात स्वतःच जाहीर केले. २५ हजार झाडे तोडले असताना, मग मग हट्टाने मेट्रो कारशेडचे काम का थांबवले?, तर मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरून सुद्धा सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईला २०३० पर्यंत आपत्ती मुक्त करणार हे फक्त स्वप्न. या अर्थसंकल्पात केवळ ५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईकरांना पावसाळ्यातील हाल, पुर परिस्थिती पुन्हा पाहावे लागणार असल्याचा आरोप सुद्धा शेलार यांनी यावेळी केला.