Saturday , March 17 2018

मुक्ताईनगरात महिला कारकुनाशी हुज्जत ; होमगार्डविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर:-  तहसील कार्यालयातील अपंग महिला अव्वल कारकुनाशी उद्धटपणे वागुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ येथील होमगार्डवर सोमवारी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचखेडा बु.॥ येथील महेंद्र बळीराम बोरसे हे तालुक्यातच  होमगार्ड म्हणून सेवेत आहे.
बोरसे याने 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयात येवून कार्यालयातील अव्वल कारकुन उज्वला प्रकाश सोनार ह्या कार्यालयीन कामकाज करीत असतांना त्यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्याशी उद्धटपणे वागून दमदाटी केली. या प्रकरणी उज्वला सोनार यांच्या फिर्यादीवरुन महेंद्र बोरसेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला.  होमगार्ड बोरसे याचा अहवाल जिल्हा समादेशक अधिकारी यांना पाठविण्यात येणार असून न्याययालयाच्या परवानगीने पुढील तपास करणार आहे तसेच बोरसे हा होमगार्ड चा धाक दाखवून तालुक्यातील नागरीकांना नेहमी धमकावत असतो व शासकीय कर्मचार्‍यांना माहीतीचा अधिकार टाकण्याची धमकी देतो अशी माहीती मिळाल्याचेही  चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी दिली.

हे देखील वाचा

पिंप्रीनांदू शिवारात हरभरा पेटल्याने एक लाखांचे नुकसान

मुक्ताईनगर: – तालुक्यातील पिंप्रीनांदू शिवारात कापून ठेवलेल्या हरभर्‍याला आग लागल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *