मुक्ताईनगरात विजय लक्ष महाबाईक रॅली

0

माजी मंत्री खडसेंसह खासदार रक्षा खडसेंचा सहभाग

मुक्ताईनगर- नरेंद्र मोदी यांना परत देश्याच्या पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी व भाजपाला लोकसभेत बहुमत मिळवून देण्यासाठी देशभरात विजय लक्ष 2019 महाबाईक रॅलीचे 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले तर मुक्ताईनगरातही भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित विजय संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.

यांचा होता सहभाग
जिल्ह परीषद उपावध्यक्ष नंदकिशोर महाजन, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विधानसभा विस्तारक विलास धायडे, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भाजप शहराध्यक्ष मनोज तळेले, सरचिटणीस संदीप देशमुख, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, मुक्ताईनगर नगरपंचायत गटनेते पियुष मोरे, उपगट नेते संतोष कोळी, नगरसेवक शकील खटकी, माजी सरपंच ललित महाजन, प्रदीप साळुंखे, विनोद पाटील, माजी सभापती राजू माळी, चंद्रकांत भोलाने, सुनील काटे, भैय्या पाटील, मुन्ना बोंडे, निलेश मालवेकर, सर्व भाजप आणि युवा मोर्चा, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.