मुक्ताईनगरात 15 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

0

भुसावळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरातील एस.एम.कॉलेजलगतच्या प्रशस्त आठ एकराच्या मैदानावर शनिवार, 15 रोजी शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात शेतकरी हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या मेळाव्यास माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याच्या दृष्टीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांतर्फे तयारीला वेग देण्यात आला आहे.