मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या गटनेतेपदी पियुष मोरे

0

उपगटनेतेपदी बबलू कोळी यांची निवड : जिल्हाधिकार्‍यांकडे गटाची नोंदणी

मुक्ताईनगर- नवनिर्मित मुक्ताईनगर नगरपंचायतीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले होते तर 17 पैकी 13 जागांवर भाजपा उमेदवार निवडून आल्यानंतर एका अपक्षानेही भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे गट स्थापन करून नोंदणी करण्यात आली. गटनेतेपदी युवा नगरसेवक पियुष मोरे यांची निवड करण्यात आली तर उपगटनेते पदी संतोष (बबलू) कोळी यांची निवड करण्यात आली. या गटात भाजपाचे मुकेश वानखेडे, साधना ससाणे, शबाना बी.अब्दुल आरीफ, खान बिल्कीस अमानुल्ला, खान शमीम अहमद, बागवान बिलकीस शे.आसीफ, खाटीक शे.शकील शे.शकूर, शे.मस्तान इमाम, कुंदा पाटील, निलेश शिरसाट, मनीषा पाटील व अपक्ष खान नुसरत बी.मेहमूद या नगरसेवकांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
गटनोंदणी प्रसंगी नूतन नगराध्यक्षा नजमा तडवी, भाजपा जिल्हा चिटणीस राजू माळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, भाजपा शहराध्यक्ष मनोज तळेले, योगेश कोलते, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, सतीश चौधरी, संदीप देशमुख, पांडुरंग नाफडे उपस्थित होते. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पदाधिकार्‍यांचा गौरव केला.