मुक्ताई पालखी सोहळ्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात

0 2

देऊळगाव महिजवळ टेम्पोला लक्झरीची धडक : 11 वारकरी जखमी

मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत पंढरपूर येथे गेलेल्या वारकर्‍यांच्या उभ्या वाहनाला लक्झरी बसने मागून धडक दिल्याने 11 वारकरी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास देऊळगाव मही (जि.बुलढाणा) येथे घडली. जखमींवर देऊळगाव मही येथे प्रथमोपचार करून बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. वाहन चालकावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहुसंख्य वारकरी बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील आहेत. जखमींना दवाखान्यात व इतरांना घरी सोडण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी तत्काळ सहकार्य केले. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील तातडीने पंढरपूर येथून देऊळगाव मही कडे रवाना झाले. या अपघातात शिवाजी सुखदेव ताट, (रा.जलचक्र, ता.बोदवड), विमलबाई बाबुराव माळी (रा.खकनार, ता.बर्‍हाणपूर), शांताबाई धनसिंग पाटील (रा.मोंढावा, ता.जळगाव), शेवंताबाई रामा पाटील (रा.चिंचखेड़ा, ता.जळगाव), जिजाबाई गोरेलाल ठाकूर (शिकारपुरा, बर्‍हाणपूर), सुशीला हरिभाऊ पाटील ( खकनार, ता.बर्‍हाणपूर), रंजना बळीराम पाटील ( रुइखेड़ा ता. मुक्ताईनगर), सुनिता विलास महाजन (रा.शहापूर, ता.बर्‍हाणपूर), भारती आनिल पाटील (बेलसवाडी, ता.मुक्ताईनगर), वैशाली विजय कोडे (रा.भामलवाडी, ता.रावेर), माधुरी श्रीराम महाजन (खकणार, ता.बर्‍हाणपूर) हे जखमी झाले.