मुक्ताबाई पालखीचे 16 रोजी मुक्ताईनगरात आगमन

0

भव्य वारकरी सांप्रदायीक दिंडी स्पर्धा : बाल, पुरूष व महिला गटात स्वतंत्र बक्षिसे

मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळा आगमनाप्रीत्यर्थ शहरात गुरुवार, 16 ऑगस्ट गुरूवारी भव्य वारकरी सांप्रदायीक दिंडी स्पर्धा होणार आहे. श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथून परंपरेने प्रदिर्घ वर्षापासून मानाची संत मुक्ताबाई पालखी सोहळा विठूरायाच्या भेटीसाठी जातो. परतवारीस मुक्ताईनगर पालखीचे स्वागत ग्रामस्थांकडून उत्स्फूर्तपणे केले जाते. यंदादेखील 16 रोजी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. बाल, पुरूष व महिला या तीन गटात स्वतंत्र बक्षिसे ठेवून वारकरी संप्रदायासाठी दिंडी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सहभागाचे आवाहन
स्पर्धेचा आरंभ नवीन मंदिरापासून होईल जुन्या मंदिरात सांगता होईल. नावे नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 12 ऑगस्टपूर्वी संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालखी आगमन सोहळा उत्सव समिती, ग्रामस्थ मुक्ताईनगर कोथळी, सालबर्डी व अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी केले आहे.