मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वरा भास्कर कडून कौतुक

0

मुंबई: सिनेअभिनेत्री स्वरा भास्कर हिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरे मेट्रो कार शेड विषयी घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तिने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ‘उशिर झाला… पण उद्धव ठाकरे यांनी उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे’ असे म्हटले आहे. आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देत एक पानही तोडणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. या निर्णयासाठी स्वरानं ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

स्वरानं ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिचं हे ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेट्रोसाठी आरेतील वृक्षतोड सरु झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यात स्वरा भास्करनंही ही वृक्षतोड थांबायला हवं असं मत व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांचं वृक्षप्रेम सर्वांनाच माहित आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचं त्यांनी देखील कौतुक केलं असून आरे मधील वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सहकार्य करण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, या विधानाचं आम्ही महाराष्ट्रातील झाड लावणाऱ्यांच्यावतीनं स्वागत करतो, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.