मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जळगाव दौरा; जाणून घ्या मिनिट टू मिनिट दौरा !

0

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उद्या शनिवार 15 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा अधिकृत शासकीय दौऱ्याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.

असा आहे दौरा

शनिवार दुपारी 12.40 वा. नंदूरबार हेलीपॅड येथून हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण. दुपारी 1.20 वा. जैन हिल्स हेलिपॅड, जळगाव येथे आगमन. दुपारी 1.25 वा. मोटारीने जैन हिल्सकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. आकाश, जैन हिल्स येथे आगमन. दुपारी 1.30 पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा. दुपारी 3.00 वा. मोटारीने जैन हिल्स हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.05 वा. जैन हिल्स हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 3.10 हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.25 वा. संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर येथे आगमन. दुपारी 3.30 मोटारीने सभास्थळ संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, बऱ्हाणपुर रोडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. सभास्थळ, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान येथे आगमन. दुपारी 3.35 वा. भव्य शेतकरी मेळावा. सायंकाळी 4.45 वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.50 वा. हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4.55 वा. हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 5.15 वा. विमानाने नाशिककडे प्रयाण.