मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात

0

धरणगावच्या जनजाती मेळाव्याला हजेरी तर भुसावळातील विकासकामांचे करणार उद्घाटन

भुसावळ- राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस गुरुवार, 21 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. धरणगाव रेल्वे स्थानकासमोरील क्रांतीकारी ख्वाजा नाईक स्मृती संस्थेतर्फे होणार्‍या जनजाती मेळाव्यास मुख्यमंत्री 11 वाजता हजेरी लावतील. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाही भैय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत तर भुसावळला दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्घाटन होणार आहे. आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर होणार्‍या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यासह खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन, सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन तसेच नगरपालिका उद्यानाचे लोकार्पण, प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री करणार असून त्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत.

मुख्यंत्र्यांच्या घोषणेकडे लागले लक्ष
तब्बल साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्री भुसावळ शहरात येत असल्याने ते भाषणात नेमकी काय घोषणा करतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. भुसावळातील प्लॉस्टीक पार्कसह जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्र्यांनी गत काळात घोषणा केल्या असल्यातरी त्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने गुरुवारच्या दौर्‍या मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा वा भाषण करतात? याकडे लक्ष लागले आहे.

या प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार राजु मामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार दिलीप भोळे, कैलास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, बेटी बचाओ बेटी पढाओचे डॉ.राजेंद्र फडके, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, बुलढाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन, जळगाव महापौर सीमा भोळे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, लोकसभा संयोजक माधवराव गावंडे, माजी सभापती सुरेश धनके, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे, पद्माकर महाजन, कैलास चौधरी, जिल्हा चिटणीस राजु माळी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष द्रुपतराव सावळे, अशोक कांडेलकर, उद्योजक मनोज बियाणी, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, रवींद्र खरात, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन, भुसावळ रेल्वेचे डीआरएम आर.के.यादव, पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदींची उपस्थिती राहणार आहे.