मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर पुनरुच्चार !

0

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा गेल्या १५ दिवसांपासून सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु असल्याने नवीन सरकार बनू शकलेले नाही. दरम्यान सद्यस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचे सगळे सूत्र ज्याच्या हातात आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून बैठकीतील काय निर्णय झाला? याबाबत आमदारांनी बोलणे टाळले आहे. बैठकीतील निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे राखीव असून ते निर्णय जाहीर करणार आहे. परंतु काही आमदारांनी शिवसेना आमदारांची बैठक संपली असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार यात काही तडजोड नाही, परंतु जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याचा अधिकार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीतील काहीही बाहेर लिक होऊ नये यासाठी खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचे स्वरुप आले होते. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.