मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; डिस्चार्जनंतर संजय राऊत पुन्हा गरजले

0

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांन डिस्चार्ज देण्यात आले आहे. दरम्यान डिस्चार्जनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पुन्हा शिवसेनेचाच होणार असल्याचे पुनरुच्चार केले आहे. प्रकृती बिघडली असतानाही संजय राऊत राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून होते. शिवसेनेकडून त्यांनी यापूर्वी राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. संजय राऊत रुग्णालयात असताना त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे नेते आशिष शेलार आणि त्यानंतर आज कॉंग्रेस नेत्यांनी राऊत यांची भेट घेतली होती.

संजय राऊत आणि शिवसेना सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने भाजप आणि शिवसेनेत बिनसले. महायुतीत निवडणूक लढविली असताना शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी बोलणी सुरु झाली. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी देखील शिवसेनेशी आघाडी करण्यास अनुकूल असल्याचे दिसते. थोड्याच वेळापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे.