मुख्यमंत्र्यांच्या सभेला आठ हजार कार्यकर्ते जाण्याचा निर्धार

0

मुक्ताईनगरात शक्ती प्रमुखांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक ; खासदार रक्षा खडसेंच्या कार्याचा लेखाजोखा होणार सादर

मुक्ताईनगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन गुरुवार, 21 रोजी भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.ग्राऊंड) मैदानावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या सभेला मुक्ताईनगर तालुक्यातून आठ हजार कार्यकर्त्यांनी जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयात माजी मंत्री आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी तसेच शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली.

आठ हजारावर कार्यकर्ते सभेला जाणार
मुक्ताईनगर तालुक्यातून या कार्यक्रमासाठी आठ हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा संकल्प यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी संकल्प केला. आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे होणार्‍या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करून स्व.रामभाऊ म्हाळगी व स्व.प्रमोदजी महाजन यांनी सुरू केलेल्या कार्यवृत्तांत प्रकाशनाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात पुढे जात असताना मागे वळून पाहतांना आपल्या कामाचे सिंहावलोकन केले पाहिजे त्यातून आपण कुठे कमी पडलो आणि ते पुढे कसे करून घेता येईल हे समजते, असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी केले तर जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आढावा घेतला. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांनी केले तर आभार सतीश चौधरी सर यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती रमेश पाटील, विधानसभा विस्तारक विलास धायडे, नगराध्यक्ष नजमा तडवी, सरचिटणीस डॉ.बी.सी.महाजन, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, वनिता गवळे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विनोद पाटील, राजेंद्र सावळे, भागवत पाटील, युवा मोर्चा विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्तात्रय पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, चंद्रकांत भोलाणे, डॉ.गजानन खिराळकर आदींसह प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.