मुलाची हत्या करणार्‍या संशयितास आणणार्‍या पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

0

जळगाव – तालुक्यातील डांभुर्णी येथील १६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करणार्‍या यश पाटील (वय-२६) रा. डांभुर्णी ता. यावल या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. यानंतर पोलिस वाहनातून त्याला जळगावला असतांना ममुराबाद येथे पोलीस वाहनावर दगडफेक झाल्याची धक्कादायक ११ वाजेच्या सुमारास घटना घडली.

विद्यार्थ्याची हत्या

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीचा विद्यार्थी कैलास चंद्रकांत कोळी वय १६ याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या गावातीलच दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. शेतशिवारात शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास आढळून आला होता. डोळ्यांमध्ये काड्या खुपसून आणि डोक्यात दगड आणि विटांनी मारहाण करून जबर जखमी करत त्याची निघृण हत्या केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत यावल पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एलसीबीकडुन संशयितासह गुन्ह्याचा छडा

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्याचा छडा लावला. विद्यार्थ्याची हत्या करणारा तरुण गावातीलच यश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. संशयित तरुण शनिवारी यावल हा गावातीलच शेतकरी सुपडू रमेश साळुंखे यांच्या कोळन्हावी शेतशिवारात असल्याची माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कर्मचार्‍यांच्या ताफ्याने त्याच्या मुसक्या आवळल्या

असा गवसला पोलिसांना धागा

संशयित आरोपी यश पाटील याने दोन वर्षापुर्वी एका विद्यार्थ्याचे डोळे फोडले होते. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विद्यार्थ्याच्या हत्या त्यानेच केल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षकांना होता. त्यानुसात तपासात संशयित यश हाच निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. संशयित हा मानसिक रूग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीसांच्या गाडीवर दगडफेक

आज सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी यश पाटील याला अटक केली. संशयित आरोपीस एलसीबीने ममुराबादमार्गे जळगाव येथे नेत असतांना ममुराबाद येथे पोलीसांच्या गाडीवर दगडफेक केली. वेळीच पोलिसांनी जमावाला पांगवुन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याला जळगावात आणण्यात आले आहे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असुन चौकशी सुरु आहे.