मुलासह भुसावळातील विवाहिता बेपत्ता

0

भुसावळ : शहरातील नाहाटा महाविद्यालय परीसरातील 27 वर्षीय विवाहिता आपल्या दिड वर्षीय मुलगा व सासूसह बेपत्ता झाल्याची घटना 16 रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या प्रकरणी विनोद आनंदा महाजन (नाहाटा महाविद्यालयाजवळ, कश्मिरी पॅलेजसजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात उभयंतांच्या हरवल्याची तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या पत्नी निकीता विनोद महाजन (27), सासु नंदाबाई अजबराव देशमुख (52), मुलगा तन्मय विनोद महाजन (1.5) हे 16 रोजी सायंकाळी पाच वाजता घरात कुणाला काही एक न सांगता निघून गेले. सर्वत्र शोध घेवूनही ते न सापडल्याने महाजन यांनी सोमवारी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.