Friday , February 22 2019

मॅजिक बसच्यावतीने हँडबॉल स्पर्धा उत्साहात

पुरंदरे हायस्कूलचा प्रथम क्रमांक 
लोणावळा : मॅजिक बस व बजाज ऑटो यांच्यावतीने तुंगार्ली येथे नुकतेच हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात बी.एन.पुरंदरे हायस्कूलने प्रथम क्रमांक तर गुरुकुल विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात प्रथम क्रमांक न्यु इंग्लिश स्कूल, टाकवे व द्वितीय क्रमांक बी.एन. पुरंदरे हायस्कूलने पटकावला.
लोणावळा नगर परीषदेच्या नगरसेविका मंदा सोनवणे, गौरी मावकर, माजी नगरसेवक संजय गायकवाड, जयश्री काळे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयुर ढोरे, माजी सरपंच बबन खरात, शिवराज मावकर आणि गुरुकुलचे मुख्याध्यापक बापुलाल तारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण 110 मुलांनी आणि 110 मुलींनी असे एकूण 220 शालेय विद्यार्थ्यांनी आणि 15 शाळेचे शिक्षक प्रतिनिधीनी सहभाग घेतला. मॅजिक बसच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला खेळण्याचा आनंद मिळाला व जीवन कौशल्य अनुभवण्याची संधी मिळाली असे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.
यांचे लाभले सहकार्य
हँडबॉल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पराग येवले यांनी मार्गदर्शन केले तर प्रकल्प व्यवस्थापक विनोद भालेराव यांनी प्रस्ताविक केले. तालुका प्रकल्प समन्वयक राहुल आरे, प्रवीण पवार, हनुमंत डिकले, राकेश पवार, सुषमा हेगडे, तेजस्वीनी आंबूसकर, सुनील पवार, नीलम जाधव, सिद्धार्थ पडघन, प्रिया पंडित, मयूर टेंबे, परमवीर शेंडगे व समुदाय समन्वयक यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा हेगडे तर आभार प्रदर्शन वैभव खामगावकर यांनी केले.
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

‘पीसीएनटीडीए’चे सीईओ सतिशकुमार खडके यांची बदली

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)सतिशकुमार खडके यांची बदली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!