मेट्रो वाघोलीपर्यंत सुरू करण्याची मागणी

0

वाघोली : वाघोली हे पुणे महानगरपालिकेच्या लगतचे नगर रोडवरील अतिशय जलद गतीने नागरीकरण होत असलेले गाव आहे. या गावची लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास आहे. येथे अनेक गृहप्रकल्प आहेत. नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी मोठ्या प्रमाणात असल्याने दळणवळणाची साधने सध्या कमी पडू लागली आहेत. वाढते शहरीकरण याचा विचार करून वाघोलीपर्यंत मेट्रो सुविधा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे व ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.