मेव्हणीवर बलात्कार करुन खून करणार्‍या जळगावच्या एकाला दुहेरी जन्मठेप

0

वेटर म्हणून नोकरी लावणार्‍या साडू सोबतच विश्‍वासघात 

चाळीसगाव तालुक्यात 2016 मध्ये घडली होती घटना.

जळगाव – चाळीसगाव तालुक्यातील एका हॉटेलातील वेटरच्या पत्नीवर हॉटेलमधील तिच्या नातेवाईक तरुणाने बलात्का करुन तिचा खून केल्याची घटना 22 नोव्हेंबर 2016 मध्ये घडली होती. जिल्हा न्यायालयाने आरोपी नरेंद्र बिनाबाई रवतेकर रा.बळीराम पेठ यास यास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाचे न्या. आर.जे.कटारिया यांनी हा सोमवारी हा निकाल दिला.

पिडीत विवाहितेचा पती आत हल्ली चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तो चाळीसगाव तालुक्यातील एका हॉटेलावर वेटर म्हणून कामाला होता.  यादरम्यान नात्याने साडू असलेल्या नरेंद्र रवतेकर याला पिडीतेच्या पतीने स्वतः काम करत असलेल्या हॉटेलवर वेटर म्हणून नोकरी लावली. तो पिडीत व तिच्या पतीसह राहू लागला. यादरम्यान 22 रोजी पिडीतेचा पती हॉटेलवर कामासाठी गेला. फिर्यादी घरी एकटी असल्याचे संधी नरेंदने पिडीतेवर बलात्कार करुन तिचा खून केला. काळी वेळानंतर घरी आलेल्या महेश पवार याने हॉटेलमधील पिडीलेच्या पतीला प्रकार कळविला. पिडीतेच पती सकासह घरी पोहचले असता प्रकार समोर आला. यावेळी आरोपी पीडीतेच्या मृतदेहावर वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न करत होता.

उपकाराची फेड न करता बलात्कर करुन मारले
नरेंद्र याने हॉटेलवर नोकरीसाठी पिडीतेकडे विनवणी केली होती. पिडीतेचा पती मानत नव्हता. पिडीतेच्या सांगण्यावरुन आरोपी नरेंद्रला कामावर लावले. मात्र नरेंद्र उपकाराची फेड न करता पिडीतेवर बलात्कार करुन तिचा जीव घेतला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी अरविंद देवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पीडित महिलेचा मृतदेह चाळीसगाव रुग्णालयात पाठविला. तेथे शवविच्छेदन केले असता महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बलात्काराला विरोध केला म्हणून नरेंद्रने पीडितेचा खून केला व पुरावा लपविण्याच्या उद्देशाने वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपास पूर्ण झाल्यानंतर अरविंद देवरे यांनी नरेंद्रविरुध्द कलम 302, 376 फ व 201 प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते.

अशी सुनावली शिक्षा
खटल्यात आठ जणांच्या साक्षी महत्वूपर्ण ठरल्या. आरोपीस कलम 302 प्रमाणे जन्मठेप, 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 376 फ प्रमाणे जीवंत असे पर्यंत जन्मठेप, 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तर कलम 201 प्रमाणे 7 वर्ष सश्रम कारावास, 500 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा (शेंदुर्णीकर) यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील, केसवॉच गोरख चकोर यांनी महत्वपूर्ण मदत केली. सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा (शेंदुर्णीकर) यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील, केसवॉच गोरख चकोर यांनी महत्वपूर्ण मदत केली.