मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

0


जळगाव- मेहरुण तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या गौतम कैलास चव्हाण वय 12 रा. सिध्दार्थ नगर, रामेश्‍वर कॉलनी या नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने मेहरुण तलावावरील सुरक्षेचा प्रश्‍न एैरणीवर आला आहे.

रामेश्‍वर कॉलनी येथील गौतम हा शाळेला सुट्टया असल्याने गुरुवारी 11 वाजेच्या सुमारास मेहरुण तलावावर पोहण्यासाठी गेला. तलावाच्या सांडव्याजवळ पाण्यात उतरला असता, तो बुडाला, यावेळी त्याच्या सोबतच्या मित्रांनी घटना कुटुंबियांना कळविली. त्यानुसार कुटुंबियांनी तसेच गल्लीतील तरुणांनी घटनास्थळ गाठले. गौतमला पाण्याबाहेर काढले,व तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. मेहरुणमधील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयाचा गौतम विद्यार्थी आहे. असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मेहरुण तलाव यावर्षी तुडूंब भरला आहे. यापूर्वीही अनेकदा, याठिकाणी अनेक जण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे. मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारचे बळी जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी नातेवाईकांनी व्यक्त केल्या.