मोंढाळ्यात जुगाराचा डाव उधळला : पाच जुगारी जाळ्यात

0

भुसावळ : तालुक्यातील मोंढाळा येथे तालुका पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी 6.20 वाजेच्या सुमारास जुगाराच्या अड्यावर छापा मारत पाच जुगारींना अटक करीत तीन हजार 260 रुपयांची रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी हवालदार विठ्ठल फुसे, प्रेमचंद सपकाळे, युसून शेख, प्रदीप इंगळे, रीयाज काझी यांना सोबत घेत मोंढाळा येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकत रतीलाल सुरवाडे, गणेश कोळी, अनिल कोळी, श्रावण कोळी, अशोक कोळी यांना अटक केली. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.