मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधात बसावे लागले हा नियतीचा खेळ: धनंजय मुंडे

0

धुळे: राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहे. दरम्यान आज धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी मुंडेंनी भाजपवर घणाघाती आरोप केले. राज्यातून भाजपचे सरकार घालविण्यात जनतेची महत्त्वाची भूमिका आहे. १०५ जागा निवडून आल्यानंतर देखील भाजपला विरोधात बसावे लागले हा नियतीचा खेळ आहे असे सांगत धनंजय मुंडे यांनी भाजपला लक्ष केले. भाजपची मग्रुरी मोडून काढण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली असेही मुंडेंनी यावेळी सांगितले. फडणवीस सरकारने दीड लाखाची कर्जमाफी केली त्यातही अनेक अटी-शर्थी लादून सामान्यांना त्रास दिला. आता आम्ही दोन लाखांची कर्जमाफी केली आहे त्याला भाजप नाव ठेवत असल्याचे आरोप धनंजय मुंडे यांनी केले. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे मुंडेंनी सांगितले.

भाजपला ज्यांनी विरोध केला त्यांच्या मागे ईडी लावण्याचे कामे भाजपच्या काळात झाल्याचेही मुंडेंनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारने जे जे शब्द दिले आहेत, ते सगळे करून दाखविणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले होते. ते एकाच महिन्यात करून दाखविले असल्याची आठवणही मुंडे यांनी करून दिली. दिलेला प्रत्येक शब्द हे सरकार पूर्ण करेल असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.