मोदींचा दोन भारत बनविण्याचा डाव: राहुल गांधी

0

जयपूर –भाजपच्या ‘मी चौकीदार’ या मोहिमेवरून बरेच राजकारण सुरु आहे. भाजपने या निवडणुकीत ‘मी चौकीदार’ मोहिमेला अग्रस्थानी ठेवले आहे. यावरूनच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी हे गरीब जनतेचे नाही तर अंबानी, निरव मोदी सारख्या लोकांचे चौकीदार आहे असा टोला लगावला राहुल गांधीनी लगावला आहे. आज राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मागील 5 वर्षापासून पंतप्रधान मोदी दोन भारत बनविण्याचा प्रयत्न करत आहे, एक खाजगी श्रीमंत लोकांचा तर दुसरा गरिब, शेतकरी आणि जवानांचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मी चौकीदार आहे मात्र ते कोणाचे चौकीदार आहेत हे जनतेला सांगत नाही. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार बघितलाय का? बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर कधी चौकीदार बघितलाय का? मात्र अनिल अंबानी यांच्या घरी अनेक चौकीदार आहेत, त्याठिकाणी चौकीदारांची रांग लागलेली असते. मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असे सांगितले नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

भाजपाकडून अनेक आश्वासने दिली गेली, 15 लाख रुपये मिळाले नाही, 2 करोड नोकरीचे आश्वासनही पूर्ण नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, त्यातच बचत म्हणून साठवलेले पैसेही मोदी यांनी नोटाबंदी करुन तुमच्याकडून लुटले. ज्या लोकांना आम्ही गरिबीपासून मुक्त केले अशा लोकांना मोदी यांनी पाच वर्षात पुन्हा गरिब बनवले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे सरकार जर सत्तेत आले तर भारतातील २० टक्के गरीबांच्या बँक खात्यात प्रतीवर्षी ७२,००० रुपये जमा करेल. म्हणजेच काँग्रेस ५ वर्षात ३,६०,००० रुपये गरीबांच्या बँक खात्यात जमा करुन दाखवेल असा विश्वासही राहुल गांधी यांनी जनतेला दिला.