भुसावळात कल्याण मटका खेळताना एकाला अटक

0

भुसावळ: शहरातील पटेल चहाच्या दुकानाजवळील एका टपरीच्या आडोशाला संशयीत आरोपी तुषार प्रल्हाद बर्‍हाटे (30, रा.कोलते गल्ली, भुसावळ) यास कल्याण मटका जुगार खेळताना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी 12 वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 820 रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीप परदेशी, हवालदार संजय भदाने, नाईक रमण सुरळकर, संदेश निकम, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, बापुराव बडगुजर आदींनी केली. तपास संदेश निकम करीत आहेत.