मोरगाव बु.॥ येथे चोरट्याने भरदिवसा घर फोडले : 73 हजारांचा ऐवज लंपास

0

रावेर- तालुक्यातील मोरगाव बु.॥ येथे भरदिवसा बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 73 हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. मोरगाव बु.॥ येथील रहिवासी लियानसिंग दामू पाटील हे शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून खाजगी कामासाठी बाहेर गेल्याची चोरट्यांनी संधी साधली. बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील गोदरेज कपाटाचा दरवाजा वाकवत कपाटातील 50 हजारांची रोकड तसेच पाच ग्रॅम कानातील रिंगा व तीन ग्रॅमचे झुंबर असा एकूण 73 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवला. लियानसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चौधरी करीत आहेत.