मोस्ट वॉटेंड २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर जाहीर !

0

रांची: झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या लातेहारसह परिसरातील नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या व ज्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस आहे, अशा २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर अखेर पोलिसांनी जाहीर केले आहेत.

पोलिसांनी या नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध करून स्थानिक नागरिकांना या यासंदर्भात पोलिसांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून ज्या २७ नक्षलवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले गेले आहेत, त्यांच्यावर एक लाखांपासून ते तब्बल २५ लाखांपर्यंत बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेल आहे. या अगोदर झारखंड येथील पालमू जिल्ह्यात पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याअगोदर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. नक्षलवाद्यांनी एक इमारतच स्फोटकांनी उद्धवस्त केली होती.