मोहाडी पोलिस ठाण्याच उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0

40 हजारांची लाच भोवली ः नाशिकच्या पथकाची धुळ्यात कारवाई

धुळे : मोहाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन प्रभाकर गायकवाड यांना 40 हजारांची लाच घेताना नाशिक एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोहाडी पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रार अर्जानुसार कारवाईसाठी मागितली लाच
डोंबिवली येथील 60 वर्षीय तक्रारदारांचे धुळ्यात घर असून एका इसमाने ते खोट्या स्वाक्षर्‍या करून बळकावल्याने या संदर्भात डोंबिवलीच्या तक्रारदाराने तक्रार मोहाडी पोलिसात दिला आहे. हा अर्ज उपनिरीक्षक सचिन गायकवाड यांच्याकडे आल्यानंतर चौकशी करून कारवाई करण्यासाठी गायकवाड यांनी 3 रोजी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती तर तडजोडीनंतर 40 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली होती व त्यानुसार मंगळवारी दुपारी सापळा रचण्यात आला. 40 हजारांची लाच मंगळवारी दुपारी गायकवाड यांनी पंचांसमक्ष मोहाडी पोलिस ठाण्यात स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने यशस्वी केला सापळा
नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, हवालदार सुकदेव मुरकुटे, सुनील गीते, मनोज पाटील, हवालदार संतोष गांगुर्दे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.