Saturday , April 21 2018

यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज

शहापूर । पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, नाशिक भागातील पर्यटक शहापूर विधानसभा क्षेत्रातील कसारा – विहिगावनजीक असलेला सुप्रसिद्ध अशोका धबधबा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव होता. याबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने 32 लाखांचा निधी मंजूर झाला आणि विकासकामे वेगाने होत आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळ्यात अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयीसुविधासह सज्ज होणार आहे. परिणामी अशोका धबधबावरील पर्यटकांना आले अच्छे दिन आले आहेत.

या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी लाभत असते परंतु धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी सदर ठिकाणी पायर्‍या, सुरक्षित उतरण्यासाठी रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूमस, रस्ता, पार्किंग व अशा अनेक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत होती. त्यामुळे साहजिकच स्थानिक नागरिकांच्या व्यवसायावर व पर्यटनावर परिणाम दिसून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व पर्यटकांनी सोशल मीडियामार्फत आपले आमदार पांडुरंग बरोरा यांना केलेल्या आवाहनाची दखल घेत आमदार साहेबांनी तात्काळ संबंधित विभागतील अधिकार्‍यांना संयुक्तरीत्या सोबत घेऊन अशोका धबधबावर कश्या प्रकारे उपाययोजना राबवल्या जातील याबाबत कल्पना दिली होती. याबाबत लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नागरिकांना आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली होती. बोलल्याप्रमाणे सदर कामासाठी आपले आमदार पांडुरंग बरोरा पाठपुरवठा करून 32 लाखांचा निधी मंजूर करून घेतला.

स्थानिकांना मिळणार रोजगार
गुढीपाडव्याचा मुहूर्तावर अशोका धबधब्याला भेट देऊन सदर ठिकाणी सुरू असलेल्या पायर्‍या, रोलिंग, टॉयलेट, चेंजिग रूम्स, रस्ता, पार्किंग या विकासकामाची पाहणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली. त्यांच्या समवेत रवींद्र पाटील पाटील, मनोजजी विशे, विनायक सापळे उपस्थित होते. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांनी आमदार बरोरा यांचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा

कंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन

मुंबई । राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!