यावलच्या ‘त्या’ रंगेल कर्मचार्‍याचा निलंबनाचा प्रस्ताव पाठवणार

0

यावल- ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही एड्स समुपदेशन केंद्रात चक्क समुपदेशकच एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली होती तर रवींद्र माळी या संशयीतास नागरीकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान, या घटनेच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांनी भेट देत नेमक्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. दरम्यान, संबंधित इसम सुटीच्या दिवशी समुपदेशन केंद्रात कसा आला? याची चौकशी सुरू असून समुपदेशन केंद्रात अन्य व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे तर ती महिला केंद्रात आल्याबाबतही नोंद नसल्याचे डॉ.पाटील यांनी सांगत त्याच्या निलंबनाचा वरीष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.