यावलच्या परीक्षा केंद्रावरील तोतया विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा

0 3

यावल- नगरपरीषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी परीक्षेदरम्यान ब्लॉक क्रमांक 10 मध्ये डमी विद्यार्थी बसविण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर ब्लॉक नंबर 10 मध्ये संजय कोळी हा दुसर्‍या एका विद्यार्थ्याच्या नावावर डमी म्हणून हिंदी विषयाचा पेपर लिहित असल्याचे ब्लॉक सुपरवायझर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास केंद्रप्रमुखांच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात आले तर मूळ परीक्षार्थी प्रभाकर नन्नवरे असल्याचे निष्पन्नझाल्याने संजय ज्ञानेश्‍वर कोळीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. भरारी पथकाने कॉपीवर नियंत्रण आणावे, अशीही मागणी सुज्ञ पालकातून होत आहे.