यावलमध्ये किरकोळ कारणावरून दंगल : परस्परविरोधी गुन्हे

0

दोन्ही गटाच्या 27 आरोपींविरुद्ध पोलिसात दाखल केले गुन्हे

भुसावळ- यावल शहरातील सिद्धार्थ नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगराजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसन दंगलीत झाले. हल्लेखोरांनी सर्रास लाठ्या-काठ्यांसह लोखंडी सळईचा वापर केल्याने दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले तर या प्रकरणी दोन्ही गटाच्या 27 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पहिल्या गटाच्या 17 जणांविरुद्ध गुन्हे
35 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी संजय प्रल्हाद गजरे, नितीन ताराचंद गजरे, मनोज गजरे, विकास गजरे, धुपाबाई भास्कर गजरे, सुरेश कडू गजरे, ज्योती सुरेश गजरे, उषाबाई संजय गजरे, चंद्रभागाबाई कडू गजरे, संगीता बापू गजरे, बापू रामा गजरे, शुभम बापू गजरे, रमाबाई गजरे, गजानन प्रल्हाद गजरे, प्रशांत संजय गजरे, ज्योती किरण गजरे, मनोज सुकदेव गजरे (सर्व रा. सिद्धार्थ नगर) यांच्याविरुद्ध दंगल व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 3 रोजी सायंकाळी पाच वाजता शहरात बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराजवळ तक्रारदार या टपरीत बसतात, असे म्हणजे आरोपी संजय गजरे याने अश्‍लील शिवीगाळ करीत टपरीबाहेर ओढून लज्जास्पद वर्तन केले तर आरोपी क्रमांक दोन ते सतरा यांनी हातात लाठ्या-काठ्या व सळई घेत मारहाण केली व जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली. या गुन्ह्याचा तपास एएसआय रा.का.पाटील करीत आहेत.

दुसर्‍या गटाच्या दहा आरोपींविरुद्ध गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे शनिवारी संजय प्रल्हाद गजरे (सिद्धार्थ नगर, यावल) यांनी फिर्याद दिल्यानुसार आरोपी दिलीप दामोदर, गजानन सुधाकर बिर्‍हाडे, आनंद सुधाकर बिर्‍हाडे, आकाश मधुकर बिर्‍हाडे, सिद्धार्थ अनिल जंजाळे, लताबाई अनिल जंजाळे, निलेश मनोहर सपकाळे, अनिता मनोहर सपकाळे, अनिल नीळकंठ जंजाळे, विजय मधुकर बिर्‍हाडे (सर्व रा.सिद्धार्थ नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणीचा आरोपी आनंद सुधाकर बिर्‍हाडे याने मोबाईल क्रमांक मागितल्यावरून वाद वाढला. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करून लोखंडी रॉड, काठ्या घेवून फिर्यादीस शिवीगाळ केली तर सिद्धार्थ अनिल जंजाळे यांनी लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने डोके फुटले तर जीवंत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.