यावलमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

यावल : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात नाफेडच्या शासकीय हरभरा खरेंदी केंद्राच्या खरेदीस सुरूवात करण्यात आली. बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील यांच्याहस्ते काटापुजन करण्यात आले. प्रथम क्रमांकावर असलेल्या शेतकर्‍याचा सत्कार कोरपावली वि.का. सोसायटी चेअरमन तसेच बाजार समिती संचालक राकेश फेगडे यांच्याहस्ते करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी बाजार समिती सचिव स्वप्नील सोनवणे, सहाय्यक सचिव विजय कायस्थ, कोरपावली वि.का.सचिव मुकुंदा तायडे आदी उपस्थित होते. शासकीय हरभरा खरेदी केंद्रात चार हजार 875 इतका भाव मिळणार असून शासनाकडून प्रति हेक्टरी साडेचौदा क्विंटल व जास्तीत जास्त 25 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. आतापर्यंत 750 शेतकर्‍यांनी नावनोंदणी केलेली असून शासनातर्फे नावनोंदणीस मुदतवाढ मिळाल्याने 30 एप्रिलपर्यंत रविवार व शासकीय सुटी वगळून खरेदी सोबतच नावनोंदणी देखील सुरू राहणार आहे. नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी सबएजंट म्हणून कोरपावली वि. का. सोसायटीची नेमणूक करण्यात आली आहे.