यावल तालुक्यात गावठी हातभट्ट्या केल्या नष्ट

0

यावल पोलिसांच्या धडक कारवाईने अवैधरीत्या धंदे करणार्‍या व्यावसायीकांमध्ये घबराट

यावल : यावल पोलिसांनी अंजाळे शिवारातील मोर नदीच्या काठासह भालशीव व पिंप्री शिवारातील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्याने अवैधरीत्या व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यात विविध गावांमध्ये मोठया प्रमाणावर घातक रसायनाद्वारे तयार केलेली गावटी हातभट्टीची दारू मोठया प्रमाणावर विक्री होत असल्याने यावलचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली. सोमवारी अंजाळे येथे मोर नदीकाठावर व भालशिव पिंप्री या शिवारातील असलेले तापी नदीच्या पात्रात चालत असलेला तीन गावठी हातभट्टीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करीत सुमारे 400 लिटर दारूचे कच्चे रसायने भरलेले ड्रम (टाक्या) जागीच नष्ट करण्यात आले तर घटनास्थळावरून 20 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. तापी नदीच्या पात्रात अचानक पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मुजफ्फर खान, संजय देवरे आदींनी कारवाई केली तर तीन संशयीत नदीतून पळून जाण्यात यशस्वी झाले.