यावल तालुक्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न : एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ

0

यावल- तालुक्यातील दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले होते त्यातील एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला तर दुसर्‍याची प्रकृती गंभीर आहे. तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी येथील रहिवाशी झगडू राजू बारेला (40) याने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारर्थ दाखल करण्यात आल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सांगवी येथील उल्हास चिंतामण कोळी (30) यांनीदेखील उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात डॉ.रश्मी पाटील, शीतल ठोंबरे यांनी प्रथमोपचार केले त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.