यावल प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांना जीवे ठार मारण्याची धमकी

0

राजकीय वर्तुळात खळबळ : व्हॉटसअ‍ॅपवरून दिली धमकी

यावल : यावल नगरपरीषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून करण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. धमकावणार्‍या संशयीत अज्ञात आरोपी विरूध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अश्‍लील भाषेत केली शिवीगाळ
प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्या 9860729852 या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉटसअ‍ॅपर अकाऊंटवर 7744888366 या मोबाईल क्रमांकावरील संदेश आला व त्यात अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून 33 दिवसानंतर तुझा302 करणार असून मी राजेंद्र आर. पवार, व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव असे संदेशात नमूद आहे. या संदर्भात राकेश कोलते यांच्या फिर्यादिवरून येथील पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयित आरोपीविरूध्द भादवी कलम 504, 506, 507 प्रमाणे अदखपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांना अशाप्रकारे मिळालेल्या जीवे ठार मारण्याचा धमकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगले उधाण आले आहे.