यावल : महाविकास आघाडी सरकारचा फलक दर्शवत निषेध

2

यावल : महाराष्ट्र राज्यात कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. राज्यातील महा विकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंगण ते रणांगण अशा शीर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन केले.

यांच्या नेतृत्वात आंदोलन
राज्यात कोरोना संक्रमितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा, असे मजकूर असलेले फलक हातात घेवून उमेश रेवा फेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, हेमराज फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, व्यंकटेश बारी, रीतेश बारी, स्नेहल फिरके व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.