यावल शहरातील चांद नगरात घरफोडी : 35 हजार रुपये लंपास

0

यावल- यावल शहरातील चांद नगरात घरफोडी करीत चोरट्यांनी 35 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. मुलाचे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी कपाटात ठेवलेले 35 हजार रुपये चोरांनी लांबवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील विस्तारीत भागात भुसावळ रस्त्यालगत आयेशा नगराजवळील चांद नगरातील रहिवासी चिरागोद्दीन गंभीर पटेल यांच्या निवासस्थानी मंगळवारी पहाटे चोरी झाली. मुलाची प्रकृती खालावल्याने पटेल यांनी सोमवारी त्याला जळगावातील खाजगी रुग्णालयात नेले होते. ते सोमवारी रात्री जळगावात मुक्कामी थांबले होते. मंगळवारी हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे हवे असल्याने पटेल यावलला घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांना आतील कपाट आणि मागील दार उघडे दिसले. कपाटात ठेवलेले पैसेही गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी किचनच्या वरील खिडकीतून घरात प्रवेश केला असावा, असा अंदाज आहे.