ADVERTISEMENT
जळगाव – एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून विमान, रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीद्वारे येणार्या प्रवाशांच्या जळगाव जिल्हा प्रवेशावर निर्बंध लावण्यात आले आहे. या चारही राज्यातून जळगाव जिल्ह्यात येणार्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असुन याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज काढले आहेत.