योगेंद्र यादव, उमर खालिद यांच्या सभांवरुन वादंग

0

उमर खालीद, योगेंद्र यादव व जिग्नेश मेवानी यांच्या सभांच्या परवानगीवरुन समर्थक संविधान बचाव कृती समिती व विरोधक संविधान समर्थन समितीचे पदाधिकारी असे दोन्ही गट शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या दालनात समोरासमोर आले होते. दोघंही आपआपल्या भूमिकांवर ठाम होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या सभांना परवानगी नाकारली आहे. सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात संविधान बचाव कृती समितीतर्फे शनिवारी जळगाव, अमळनेर व भुसावळ येथे विद्यार्थी नेता उमर खालीद, योगेंद्र यादव व जिग्नेश मेवानी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी समितीच्या सदस्यांनी सभा होईलच असा निर्धार केला आहे, तर भाजपसह हिंदुत्ववादी संघटना व वकीलांनीही विरोध केल्याने जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील झाले आहे.खबरदारी म्हणून तीनही शहरात पोलिसांची वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करा

जळगाव: केंद्र शासनाच्या ने कॅग हा कायद्याच्या विरेाधात सभा घेवून जिल्ह्यातील धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या नेत्यांना जिल्हयात प्रवेश बंदी करावी, अशमी गाणी जिल्हा संविधान समर्थन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

चिथावणीखोर भाषण देणार्‍या वक्त्यांमध्ये उमर खालीद याने अफजल गुरु या दहशत वाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतर देश विरोधी घोषणा दिल्या होत्या. व देशाविरुध्द लढा देणेसाठी उद्युक्त केले ओ. या व्यक्तीच्या सभेला परवानगी देणे म्हणजेच जिल्ह्याची शांतता व जातीय सलोखा भंग होण्याची शक्यता असल्याचे निवेदनाम म्हटले आहे. निवेदनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह अविनाश नेहते, जिल्हा सरकार्यवाह हितेष पवार, जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष हरीष मुंदडा, प्रात सहमंत्रीलली चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, उपमहापौर अश्विन सोनवणे, अ‍ॅड.सुचिता हाडा, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. गुरूमुख जगवानी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गटनेते भगत बालाणी, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, सभापती रविंद्र पाटील, पोपट भोळे आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 37 (1), (3) कलम लागू आहे. कायदा आणि सुव्यस्था राखली जाऊन शांतता रहावी म्हणून सभेला परवानगी नाकारली आहे. तरीही सभा घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. जादाचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक,

…तरीही सभा होणारच- प्रतिभा शिंदे

जळगाव: जिल्ह्यात अमळनेर, भुसावळ व जळगाव योगेंद्र यादव, उमर खालीद यांच्या सभांना पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने संविधान बचाओ नागरी कृती समितीच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची भेट घेतली. व त्यांना परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन दिले. यानंतरही पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. मात्र परवानगी मिळो किंवा ना मिळो तरी ही सभा होणारच, असा पवित्रा लोक संघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी घेतला असून फोनवरुन बोलतांना माहिती दिली.
निवेदनानुसार असे की, पोलीस प्रशासनाने फक्त काही हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली परवानगी नाकारण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. हिंदू मुस्लीम समाजातील व संविधान कृती समितीचे सदस्य आपणास आदेशाचा फेरविचार करावा अशी विनंती करतो, जाहीरसभेची परवानगी द्यावी. आपण जर परवानगी नाकारली व घटनेत दिलेल्या कलम 19 प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणीत असाल तर त्या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करुन त्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासनच जबाबदार राहिल. सदर सभेत व नंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची लेखी शाश्वतीही निवेदनाव्दारे देण्यात आली होती. यावेळी गफफार मलिक, करीम सालार, करीम सालार, मुकूंद सपकाळे, सचिन धांडे, प्रा. प्रितीलाल पवार, राजू मोरे, अमोल कोल्हे, फारुख शेख, सानीर सैय्यद, अशफाक मिर्झा, वसीम खान, अनवर सिकलीगर, शरीफ पिंजारी, रियाज बागवान, तय्यब शेख, रिजवान जहागिरदार, जिया बागवान, भारत ससाणे, विनोद सपकाळे, शाहीद सैय्यद, भारत सोनवणे, सुरेंद्र पाटील, भिला भाऊ राठोड आदी उपस्थिती होती.

ज्या सभेची परवानगीच मागितली तिला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पोलीस प्रशासनाला आम्ही केवळ सभा असल्याची सुचना दिली आहे. संविधानानुसार आर्टीकल कलम 19 सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. सीएएचे समर्थन करणार्‍यांनी आमचा विरोध का आहे? हे समजून घ्यावे. संविधानाला अनुसरून आमची सभा होणारच – प्रतिभा शिंदे