‘रक्षा खडसे माझी आवडती खासदार’ ; सुप्रिया सुळेंकडून खासदार रक्षा खडसेंवर स्तुतीसुमने

0

जळगाव: शहरातील बेंडाळे महाविद्यालयात शुक्रवारी 28 रोजी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी खासदार रक्षा खडसे यांचे तोंडभरून कौतुक केले. माझ्या आवडत्या खासदारांपैकी एक रक्षा खडसे आहे. धडपड करणारे नेतृत्व असून त्याचे मला कौतुक वाटते असे गौरवोद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.

राजकारणात आमचे वैचारिक मतभेद असतील. पक्ष वेगळे आहे परंतु राजकारणापलीकडे जाऊन कामाचे कौतुक केले पाहिजे हीच तर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती आहे. पक्ष वेगळे असताना कौतुक का करत आहे ?असे तुम्हाला वाटत असेल परंतु वैयक्तिक संबंधात कटुता यायला नको. पाच वर्षात जेंव्हा निवडणुका होतील तेंव्हा त्यांच्या विरोधात सभा देखील घेईल असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.