रविवारी सर्व सरकारी बँका सुरू राहणार

0

नवी दिल्ली: मार्च एडिंगमुळे या रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँका सुरु ठेवण्यात येणार आहे. आरबीआयने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकाना हे आदेश दिले आहे.

या बँकाच्या शाखांमधील देवाण-घेवाणीचे व्यवहार ३० मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरटीजीएस आणि एनइएफटीसहित इलेक्ट्रॉनिक देवाण-घेवाणही ३० आणि ३१ मार्च रोजी वाढवण्यात आलेल्या वेळेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.