रहिवास क्षेत्राचा वाणिज्य वापर; 15 व्यावसायिकांना नोटीस

0

महसूल प्रशासनाची कारवाई

जळगाव : शहरातील महामार्गालगत रहिवास क्षेत्राचा वाणिज्य वापर केल्याचा ठपका ठेवत शर्तभंग केल्याप्रकरणी तब्बल पंधरा व्यावसायिकांना महसूल प्रशासनाने आज नोटीस पाठविल्या आहेत. यात सहा हॉटेल्स, दोन हॉस्पिटल, दोन कारखाने, एक मार्बल्सचा समावेश आहे. यामुळे महामार्ग लगत विनापरवानगी हॉटेल्ससह उद्योग करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रहिवास क्षेत्राचा वाणिज्य वापर केल्याप्रकरणी गुरुवारी पोद्दार शाळेला तब्बल साडेअकरा लाखांच्या दंडाची नोटीस बजावली होती. मार्चअखेर या आर्थिक वर्षा अखेरच्या पार्श्वभूमीवर महसूल वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून थकबाकीदारांना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगत अनेक हॉटेल्स विनापरवानगीने सुरू आहे. जागेची परवानगी रहिवासासाठी आहे. मात्र तेथे हॉटेल्ससह हॉस्पिटल, कारखाने, दुकाने सुरू करण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या पथकाने विनापरवानगीने व्यवसाय सुरू करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
हॉटेल मराठा मटण, हॉटेल चक दे, हॉटेल गिरणा गार्डन, हॉटेल राजमुद्रा, हॉटेल कस्तूरराज, हॉटेल दालचिनी. हॉस्पिटल – गायत्री हॉस्पिटल, हेरंब हॉस्पिटल, हुंडाई शोरूमच्या बाजूचा काचेचा कारखाना, बारी यांचा कपाट कारखाना, गजानन मार्बल्स.