राकेश मारियांच्या विधानाला सरकारी वकील उज्ज्वल निकमांचा पाठींबा

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलीस आयुक्त यांच्या पुस्तकावरून सद्ध्या राजकरण चांगलेच पेटलेले दिसत आहे. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात २६-११ च्या हल्ल्याला पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’ हिंदू दहशतवादाचे रुप देण्याचा कट रचला होता असा उल्लेख केला आहे. मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राकेश मारिया यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राकेश मारिया यांच्या दाव्यांचं समर्थन केलंय. ‘हो हे खरं आहे की ओळखत्रांत दहशतवाद्यांची नाव हिंदू नमूद करण्यात आली होती. मुंबई कोर्टात कसाबने दिलेल्या जबाबात १० दहशतवाद्यांकडे १० बनावट ओळखपत्रं होती, हे समोर आलं होतं. या ओळखपत्रांचा वापर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केला जाणार होता, हे आम्ही कोर्टासमोर सिद्धही केलं’ असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.

दुसरीकडे, हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने, हिंदू दहशदवाद हा कट असल्याची गोष्ट मारिया यांनी गेल्या १२ वर्षांत सार्वजनिक का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या पुस्तकात मारिया यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या एकमेव दशतवादी आमिर अजमल कसाब याच्या मनगटावर हिंदुंचा पवित्र धागा ‘कलावा’ बांधण्यात आला होता, असा खुलासा केला. लष्कर ए तोयबानं मुंबई हल्ला ‘हिंदू दहशतवाद्यांनी’ घडवून आणला असं चित्रं उभं करण्याचा प्रयत्न केल्याचंही मारिया यांनी या पुस्तकात म्हटले आहे.