राजस्थानमधील राजकारण निर्णायक वळणावर; कॉंग्रेस ‘आर के पार’च्या स्थितीत

0

जयपूर: उपमुख्यमंत्री कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कॉंग्रेससह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची चिंता वाढली आहे. काल झालेल्या बैठकीत कॉंग्रेसजवळ १०९ आमदार असल्याचे दिसून आले. बैठकीनंतर सचिन पायलट यांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सचिन पायलट हे परत येण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता कॉंग्रेसकडून सचिन पायलट यांच्याशी चर्चा बंद केली जाणार आहे. यावरून राजस्थानमधील राजकारण निर्णायक वळणावर पोहोचल्याचे दिसून येते.

सचिन पायलट यांच्यासोबत अपक्षांसह २२ आमदार असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. सर्व आमदारांसह सचिन पायलट यांनी परत कॉंग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र सचिन पायलट यांची परत येण्याची मनस्थिती नसल्याने त्यांच्यावर कॉंग्रेसकडून कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष सचिन पायलट यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवू शकता, त्यानंतर बहुमताचा आकडा कमी होणार असून कॉंग्रेस सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार असल्याचे बोलले जात आहे.

काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी कॉंग्रेससह अपक्ष आमदारांची बैठक झाली. बैठकीनंतर सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आज पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.