Sunday , March 18 2018

राज्यसभा निवडणूक चुरशीची होणार?

भाजपने चार उमेदवार केले जाहीर

मुंबई : राज्यसभेसाठी सोमवारी भाजपकडून महाराष्ट्रातून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विधानसभेच्या संख्याबळानुसार तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, भाजपने चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 13 मार्चरोजी अर्जांची छाननी होणार आहे. 15 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काँग्रेसकडून सोमवारी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

23 मार्चला सहा जागांसाठी निवडणूक
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला भाजपच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. अन्यथा 23 मार्चरोजी मतदान घेण्यात येईल. 23 मार्चला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल ही राजकीय क्षेत्रातील अपेक्षा भारतीय जनता पक्षामुळे फोल ठरणार असे सध्यातरी दिसत आहे. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *