राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रातून कॉंग्रेसकडून राजीव सातवांना संधी

0

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहे. त्या पाठोपाठ आता कॉंग्रेसनेही उमेदवार जाहीर केला आहे. हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, राजीव सातव महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत.

राजीव सातव हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडूण आलेले एकमेव खासदार होते. मात्र, सन 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, काँग्रसने त्यांच्या गुजरात काँग्रेसची जबाबदारी दिली. सध्या, गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून ते कार्यरत आहेत.