राज्यसभा सदस्यांचा २२ जुलैला शपथविधी; प्रथमच अशा पद्धतीचा शपथविधी

0

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी राज्यसभा निवडणूक स्थगित करण्यात आली होती. २६ मार्चला ही निवडणूक होणार होती. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार होती. ३७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १८ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. दरम्यान बिनविरोध निवड झालेल्या राज्यसभा सदस्यांची २२ जुलैला शपथविधी होणार आहे. यंदा प्रथमच राज्यसभा सदस्य सभागृहात शपथ न घेता राज्यसभा अध्यक्षांच्या चेंबरला शपथ घेणार आहे. कोरोनामुळे प्रथमच अशा पद्धतीची शपथविधी होत आहे.

महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोंसले, भागवत कराड, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेसचे राजीव सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे.