राज्यस्तरीय कोरोना जागृती चित्रकला स्पर्धेत गोपाल अग्रवालचे यश

0

फैजपूर : भारत सध्या कोरोना व्हायरस सोबत युद्ध पातळीवर लढत आहे. या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मानतील चलबिचलता घालवण्यासाठी आणि या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. यात आणखी एक पुढचे पाऊल म्हणजे ‘तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र’ तर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा होय. तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्रतर्फे आयोजित राज्यस्तरीय कोरोना जागृती चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम स्कूल, फैजपूर येथील सहावीचा विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल याने उत्कृष्ट चित्रकारीता केली. यासाठी त्यास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गोपालच्या या यशस्वी कामगिरी बद्दल विद्यालयाचे प्राचार्य माझेस जाधव (इंग्लिश मेडियम), प्राचार्य नंदकिशोर सोनवणे (सेमी इंग्लिश मेडियम), पर्यवेक्षिका पूनम नेहेते सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोपालचे कौतुक केले.